अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व हारर्पण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, कार्यालय अधीक्षक गुलशन मिरानी, नगरसचिव संदीप वडुरकर, निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, तसेच प्रमोद मोहोड, भूषण खडेकार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते कलाकार सर्जेराव गलपट यांनी साकारलेल्या महात्मा गांधींच्या वेशभूषेचे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अनोखे व स्मरणीय रूप प्राप्त झाले.
महापालिकेच्या वतीने दोन्ही थोर नेत्यांच्या कार्य व विचारांचा आढावा घेण्यात आला आणि त्यांचे आदर्श समाजजीवनात अंगीकारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

