आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी
अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी शहरातील विविध दवाखाने व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज, सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला. […]









