अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरची विशेष सभा शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अमरावती महानगरपालिका येथे संपन्न झाली.
सदर सभेचे अध्यक्षस्थान मा. श्री. आशिष येरेकर (भा.प्र.से.), पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी, अमरावती यांनी भूषविले. यावेळी मा. श्रीमती सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती होती.
या विशेष सभेत मा. महापौर व मा. उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया शांततामय व लोकशाही पद्धतीने पार पडली. नियमानुसार मतदान घेण्यात आले असून, त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.
मतदान प्रक्रियेनंतर मा. महापौरपदी सन्मा. नगरसेवक श्रीचंद तेजवाणी यांची, तर मा. उपमहापौरपदी सन्मा. नगरसेवक सचिन भेंडे यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नवनिर्वाचित मा. महापौर व मा. उपमहापौर यांचे मा. श्री. आशिष येरेकर (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी, मा. श्रीमती सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, अमरावती महानगरपालिका तसेच उपस्थित सन्मा. नगरसेवक व सन्मा. नगरसेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


