Election

अमरावती महानगरपालिका निवडणूक : सकाळपासून मतदानाला सुरुवात, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची मतदान केंद्रांना भेट

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी शहरातील सर्व प्रभागांमध्ये सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व नियोजित पद्धतीने सुरू झाली आहे. पहाटेपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत असून शहरात मतदानाचा उत्साह वातावरण निर्माण झाला आहे. या निवडणुकीसाठी शहरात एकूण ८०५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, […]

अमरावती महानगरपालिका निवडणूक : सकाळपासून मतदानाला सुरुवात, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची मतदान केंद्रांना भेट Read More »

महानगरपालिका निवडणूक 2025–26 : नवसारी येथील मतमोजणी केंद्र सुसज्ज; आयुक्तांची पाहणी

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावती महानगरपालिका क्रीडा संकुल, नवसारी येथील मतमोजणी केंद्राची सखोल पाहणी केली. पाहणीदरम्यान मतमोजणी कक्ष, स्ट्रॉंग रूम, मीडिया सेंटर, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश–निर्गमन मार्ग, वाहतूक

महानगरपालिका निवडणूक 2025–26 : नवसारी येथील मतमोजणी केंद्र सुसज्ज; आयुक्तांची पाहणी Read More »

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : सातही झोनमध्ये मतमोजणीचे सखोल प्रशिक्षण पूर्ण

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व त्रुटीरहित पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सातही झोनमध्ये मतमोजणीसंदर्भातील सखोल प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात मतमोजणी अधिकारी, सहाय्यक अधिकारी, पर्यवेक्षक व

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : सातही झोनमध्ये मतमोजणीचे सखोल प्रशिक्षण पूर्ण Read More »

स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंतीनिमित्त श्री शिवाजी BPEd कॉलेजमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त अमरावती येथील श्री शिवाजी BPEd कॉलेजमध्ये मतदान जनजागृतीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करणे व युवकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात कॉलेजमधील विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांना मतदान शपथ देण्यात

स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंतीनिमित्त श्री शिवाजी BPEd कॉलेजमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम Read More »

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : मतदान केंद्रांच्या तयारीचा आयुक्तांकडून आढावा

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तक्षशिला कॉलेज, मनपा शाळा वडाळी, मनपा शाळा

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : मतदान केंद्रांच्या तयारीचा आयुक्तांकडून आढावा Read More »

अमरावतीत मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली; शंभर टक्के मतदानाचा निर्धार

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व शांततेत यशस्वीरीत्या पार पडली. निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 3 वाजता दसरा मैदान

अमरावतीत मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली; शंभर टक्के मतदानाचा निर्धार Read More »

आदर्श मतदानासाठी प्रशासन सज्ज; पत्रकारांसाठी ई.व्ही.एम. प्रणालीचे प्रात्यक्षिक; चार मत पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर, मतदारांमध्ये योग्य माहिती व जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने पत्रकारांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ई.व्ही.एम.) प्रणालीचे प्रात्यक्षिक आज अमरावती महानगरपालिकेत आयोजित करण्यात आले. निवडणूक जाहीर झाल्यापासून दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून शहरात आदर्श आचारसंहिता लागू असून, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.

आदर्श मतदानासाठी प्रशासन सज्ज; पत्रकारांसाठी ई.व्ही.एम. प्रणालीचे प्रात्यक्षिक; चार मत पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन Read More »

ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया सुरळीत सुरू; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सातही झोनमध्ये पाहणी

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबद्ध राहावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या झोन क्रमांक १ ते ७ येथील सुरक्षा कक्षांमध्ये ई.व्ही.एम.मधील बॅलेट युनिट (BU) व कंट्रोल युनिट (CU) सिलींग प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया सुरळीत सुरू; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सातही झोनमध्ये पाहणी Read More »

पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृतीला प्रभावी प्रतिसाद; स्वीप उपक्रमांतर्गत अमरावतीत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारा अभिनव उपक्रम

अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी वडाळी, यशोदा नगर, उत्तम नगर, चैतन्य कॉलनी, साईनगर व विलास नगर परिसरात पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व, मतदान हा नागरिकांचा कर्तव्यभाव तसेच योग्य उमेदवाराची जाणीवपूर्वक निवड करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. पथनाट्यांद्वारे सोप्या व प्रभावी शैलीत

पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृतीला प्रभावी प्रतिसाद; स्वीप उपक्रमांतर्गत अमरावतीत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारा अभिनव उपक्रम Read More »

मजबूत लोकशाहीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार; अमरावती मनपात मतदार जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांची समन्वय बैठक

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मतदार जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक बुधवार, 7 जानेवारी 2026 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी मार्गदर्शन करत सामाजिक संस्थांची भूमिका लोकशाही प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

मजबूत लोकशाहीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार; अमरावती मनपात मतदार जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांची समन्वय बैठक Read More »

Scroll to Top