मनपात महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री जयंती साजरी

शुक्रवार दिनांक २ ऑक्‍टोंबर,२०२६ रोजी महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला.

महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले.

उपस्थित कार्यक्रमानंतर जयस्‍तंभ चौकातील महात्‍मा गांधी यांचे पुतळ्याला हारार्पण करण्‍यात आले.

यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, नगरसेविका सुरेखा लुंगारे, नगरसेवक मनिष बजाज, संजय तिरथकर, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, उद्यान निरीक्षक श्रीकांत गीरी, प्रमोद मोहोड, अमोल साकुरे, श्री.गोडबोले, भुषण खडेकार, सतिश ताथोड, गणेश काकडे, अखिलेश खडेकार, धिरज पार्शिवकर, मंदार नानोटी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महात्‍मा गांधी यांच्‍या वेशभुषेत अभिनेता सर्जेराव गलपट उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top