महानगरपालिका शाळा क्र. 14 वडाळी येथे सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ

महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 14 वडाळी येथे नुकतीच सेवा संकल्प अभियानाला सुरुवात करण्यात आली.

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती च्या मुहूर्तावर सदर सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करून विकसित भारत या संकल्पनेवर आधारित उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच प्राथमिक वर्गातील मुलांची रंगभरण स्पर्धा सुद्धा यावेळी पार पडली.

यावेळी विद्यार्थ्यांनी माझी शाळा सुंदर शाळा, माझ्या स्वप्नातील शाळा २०४७ , तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळातील भारत, स्वच्छ, हरित व स्वयंपूर्ण भारत ,भारतीय शेती व आधुनिक शेतकरी, एक भारत, श्रेष्ठ भारत – समृद्ध संस्कृती आणि विकास या विविध विषयावर आकर्षक व सुंदर चित्रे काढली.

कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश पखाले व शिक्षकांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण केले.

कार्यक्रम तथा स्पर्धेच्या आयोजनाकरिता सुलोचना डाखोळे, निशा चव्हाण, स्मिता वानखडे, ज्योत्स्ना गवई,मोनिका पंधरे अनिता विधाते, प्रणिता देशमुख ,वैशाली देशमुख, मनीषा वाकोडे, ज्योती सातपुते ,नीलिमा लव्हाळे अनुप भारंबे ,चेतना बोंडे, कल्पना सवई ,भाग्यश्री गणगणे , राजकुमार जाधव, रूपाली आडोळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top