अमरावती महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम

अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त व प्लास्टिक नोडल अधिकारी श्री. विनोद टांक यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक ०१ अंतर्गत रामपुरी कॅम्प येथील इतवारा बाजार परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत एकूण २२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल ‘अमर सोडा’ या आस्थापनावर रु. ५,०००/- दंड तर डस्टबिन नसल्यामुळे ‘इंदौर जिलेबी कॉर्नर’ या आस्थापनावर रु. १,०००/- दंड आकारण्यात आला. या कारवाईतून एकूण रु. ६,०००/- दंड वसूल करण्यात आला.

महानगरपालिकेतर्फे व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापर टाळण्याचे व कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top