अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या; नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद
अमरावती महानगरपालिका, माननीय आयुक्त सौ. सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक, उपायुक्त सौ. डॉ. मेघना वासनकर यांचे मार्गदर्शन, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे सर यांच्या निदर्शनाखाली डॉ. स्वाती कोवे (RCH अधिकारी), डॉ. पाठबागे सर, डॉ. रुपेश खडसे, डॉ. माधवी वानखडे यांच्या पर्यवेक्षणाखाली शहरी आरोग्य केंद्र, मसानगंज येथे दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य शिबिरात सहभाग:
शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. अलमास खान मॅडम, पीएचएन, आरोग्य सेविका/सेवक, आशा वर्कर तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
उपस्थित तज्ज्ञ डॉक्टर:
जनरल तपासणी: डॉ. स्नेहल पवार, डॉ. शिवानी शिंदे, डॉ. रक्षदा अंजुम, डॉ. गुजर
त्वचारोग: डॉ. नेहा विधले
स्त्री रोग: डॉ. कौस्तुभ देशमुख
बालरोग: डॉ. माधुरी
नेत्रतज्ज्ञ: प्रणाली चांभारे (टीम Disha Eye Foundation)
कृष्टरोग/न्यूट्रिशन तपासणी: डॉ. नवरे मॅडम, अविनाश इंगळे सर
क्षयरोग: अमोल जांभोळे सर व RNTCP कर्मचारी
दंततज्ज्ञ: डॉ. प्रसाद (टीम दंत विद्यालय)
शिबिरातील परिणाम – आकडेवारी:
एकूण तपासणी – 668
ऑनलाइन डेटा एन्ट्री – 668
गरोदर माता तपासणी – 59
लसीकरण – 25
डोळ्यांची तपासणी – 55
त्वचेची तपासणी – 138
X-RAY तपासणी – 55
थुंकी तपासणी – 6
एनसीडी तपासणी – 352
आभा कार्ड – 30
गोल्डन कार्ड – 22
रक्त तपासणी – 132
हा आरोग्य शिबिर “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा अमरावती महानगरपालिकेचा सततचा प्रयत्न दर्शवितो, आणि नागरिकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अभियानाची यशस्वीता अधोरेखित होते.








