अमरावती महानगरपालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन; शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले.

यानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणात सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.

नागरिकांना मौन पाळण्याबाबत सूचना देण्यासाठी महानगरपालिकेमार्फत सकाळी १०.५९ ते ११.०० वाजेदरम्यान सायरन वाजविण्यात आला.

तसेच मौन संपल्याची सूचना देण्यासाठी सकाळी ११.०२ ते ११.०३ वाजेदरम्यान पुन्हा सायरन वाजविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व देशसेवेच्या मूल्यांची आठवण करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत शांततापूर्ण व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top