मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी मोठा उपक्रम | ३१८ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे; ४६२ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ उपचारासाठी संदर्भ
अमरावती महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम साधणारे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्य तपासणी उपक्रमाचा सविस्तर आढावा महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीआरोग्याची वेळेत तपासणी, योग्य उपचार व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा […]




