उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक असून, या घटनेमुळे अमरावती शहरात शोककळा पसरली आहे.
या दु:खद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत आज शोकसभा आयोजित करून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या शोकसभेत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहिली.




