अमरावतीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत आयोजित आरोग्य शिबिराने शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकतेचा उत्साह वाढवला. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चाललेल्या या शिबिरात १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, ज्यामध्ये महिला – ९,४६३ आणि पुरुष – ३,५२९ यांचा समावेश आहे.

शिबिरात विविध तपासण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये जनरल तपासणी, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, दंतरोग, क्षयरोग, सिकलसेल तपासणी, लसीकरण आणि NCID तपासण्या यांचा समावेश होता. त्यासोबतच, आवश्यक औषधोपचार देण्यात आले आणि गरजेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भितही केले गेले.

उपस्थित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, ज्यामुळे शहरात आरोग्य जागरूकतेला मोठा चालना मिळाली. या शिबिरात ऑनलाइन डेटा एन्ट्री – १२,९९२, गरोदर माता तपासणी – ९९२, डोळ्यांची तपासणी – २,५०८, त्वचेची तपासणी – ३,२०१, X-RAY तपासणी – ८००, CBNAAT तपासणी – २२४, एनसीडी तपासणी – ७,७६२, आभा/गोल्डन कार्ड – ९१३ यांसारख्या तपासण्या रेकॉर्ड करण्यात आल्या.

सदर अभियानातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला असून, स्वस्थ नारी सशक्त परिवार या उद्देशाला पुढे नेण्यात मोठा हातभार लागला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top