स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती (प्रतिनिधी) :
केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार स्‍वस्‍थ नारी सशक्‍त परिवार हे अभियान दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२५ ते २ ऑक्‍टोंबर,२०२५ या कालावधीमध्‍ये राबविण्‍यात येणार आहे तसेच सार्वजनिक आरोग्‍य विभाग महाराष्‍ट्र शासन यांचे दिलेल्‍या निर्देशानुसार व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर यांचे निर्देशानुसार तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र, भाजीबाजार येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे पर्यवेक्षण डॉ. स्वाती कोवे (RCH अधिकारी), डॉ. संदीप पाटबागे व डॉ. माधवी वानखडे यांनी केले. शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा सुरंजे, पीएचएन सौ. उमा जाधव, आरोग्य सेविका/सेवक, सर्व आशा वर्कर, HWC आनंदनगर कर्मचारी तसेच विविध तज्ञ डॉक्टर्स व टीम यांनी सहभाग नोंदविला.

शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. त्यात –
• जनरल तपासणी : डॉ. तुषार पोहनकर
• एनसीडी तपासणी : डॉ. शिवानी शिंदे
• मानस रोग तज्ञ : डॉ. अनुराग खापरी
• त्वचारोग तज्ञ : डॉ. मुकुंद गुजरकर
• स्त्रीरोग तज्ञ : डॉ. वैशाली भोजने
• बालरोगतज्ञ : डॉ. कौस्तुभ देशमुख, डॉ. तुषार गुल्हाने, डॉ. रशीद
• नेत्र तपासणी : प्रणाली चांभारे व हिमांशु बंड, राशीद या दिशा आय फाउंडेशनच्‍या चमुद्वारे वाहनात उपलब्‍ध नेत्र तपासणी करण्‍यात आली.
• क्षयरोग तपासणी : डॉ. फिरोज खान (क्षयरोग अधिकारी) व RNTCP टीम
• दंतरोग तपासणी : डॉ. सारिका कलंत्री व त्‍यांचे चमू व दंत वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती (विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या सहकार्याने)
नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे –
• एकूण तपासणी : ५१५
• ऑनलाइन डाटा एन्ट्री : ४८०
• गरोदर माता तपासणी : ६७
• लसीकरण : ७६
• डोळ्यांची तपासणी : ६८
• त्वचेची तपासणी : १५०
• एक्स-रे तपासणी : ८२
• एनसीडी तपासणी : १३८
• आभा कार्ड नोंदणी : २५
• रक्त तपासणी : ११८

नागरिकांना तपासणीसह आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच विशेष उपचारांची गरज भासलेल्या रुग्णांना पुढील स्तरावर संदर्भित करण्यात आले.

या उपक्रमामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध तज्ञ डॉक्टर्सकडून मोफत तपासणी व उपचार मिळाले. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या शिबिराचा लाभ घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top