इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत हारार्पण कार्यक्रम संपन्न

अमरावती महानगरपालिकेत माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि भारताचे लोहमनुष्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हारार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडला.

हारार्पण कार्यक्रमानंतर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकता शपथ घेतली.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, उपअभियंता सुहास चव्हाण, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता लक्ष्मण पावडे, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेचा संदेश देत, इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण आणि आदरांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top