अमरावती महानगरपालिकेत ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्सव — सामूहिक गायनातून एकता आणि देशप्रेमाचा संदेश

‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेत विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाली. देशभक्तीच्या घोषणांनी सभागृह दुमदुमले आणि वातावरणात अभिमान, एकता आणि ऊर्जा पसरली.

या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्‍या शर्मा चांडक यांनी सांगितले की, ‘वंदे मातरम्’ हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे प्रेरणास्थान असून ते राष्ट्रनिष्ठा, एकता आणि त्यागाचे प्रतीक आहे. देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची भावना नागरिकांच्या मनामनात रुजविणे हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे सांगितले की, अशा सामूहिक उपक्रमांमधून युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होते आणि समाजात एकता, सौहार्द आणि आपलेपणा वाढतो.

कार्यक्रमाला अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त डॉ. मेघना वासनकर, मुख्य लेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्‍त अविनाश रघटाटे, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top