अमरावती महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई — पहिल्या टप्प्यात १२५ अनधिकृत दुकाने हटविली

दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत अनधिकृत बांधकामे, टिनशेड दुकाने आणि खोके हटविण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे १२५ अनधिकृत दुकाने आणि टिनशेड पाडण्यात आली, तर उर्वरित अतिक्रमणांवर पुढील काही दिवसांत कारवाई सुरू राहणार आहे.

ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सुमारे ३०० दुकाने असून, त्यापैकी अनेक दुकाने परवानगीशिवाय उभारण्यात आली होती. अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यासाठी तीन जेसीपी मशीन आणि तीन मोठे ट्रक तैनात करण्यात आले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी शिस्तबद्ध बंदोबस्त ठेवत कोणताही अनुशासनभंग होऊ न देण्याची खबरदारी घेतली.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत. स्वच्छतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने प्रशासनाने शहरव्यापी अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top