मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे संदर्भाधीन पत्रानुसार अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम आज दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महानगरपालिका, अमरावती येथे पार पडला.
सदर सोडत कार्यक्रमात जेवड येथील महानगरपालिका व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वर्ग ४ था ‘अ’ मधील कु. विरा अंकुश हनवते, कु. मसिरा शेर खान, सम्यक सुनील कटकतलवारे तसेच वर्ग ४ था ‘ब’ मधील कु. ईश्वरी गोपाल कराळे आणि युवराज प्रदीप मते या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
या सोडत कार्यक्रमास अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित होते.






