अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक २ सप्टेंबर २०२५ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा आज, १४ नोव्हेंबर २०२५, महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी भूषविले.
स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे परीक्षण क्षेत्रातील प्रातिनिधिक व अनुभवी परीक्षक मंडळी — श्री. उदय खोत (BFA), श्री. विकास केमदेव (MA) आणि श्री. अद्वेत केवले (B.Sc. Environmental Science) — यांच्या संयुक्तपणे व तज्ज्ञ दृष्टीकोनातून करण्यात आले. त्यांच्या सर्वसमावेशक मूल्यांकनानंतर स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते विजेत्यांना खालीलप्रमाणे सन्मानित करण्यात आले :
मुख्य पारितोषिके:
प्रथम क्रमांक : श्री. शंतनु पाटील
छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ११,०००/- रोख
द्वितीय क्रमांक : श्री. भूषण अळसपुरे
छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ७,०००/- रोख
तृतीय क्रमांक : श्री. संदीप चौधरी
छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ५,०००/- रोख
प्रोत्साहनपर पारितोषिके:
श्री. सुशांत पांडे
छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. ३,०००/- रोख
श्री. मनीष मु-हेकर
छायाचित्र फोटो, प्रमाणपत्र व रु. २,०००/- रोख
या स्पर्धेला शहरातील व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमरावतीच्या सौंदर्य, संस्कृती आणि दैनंदिन जीवनाचे विविध पैलू उजागर करणाऱ्या अनेक उत्कृष्ट छायाचित्रांमुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. स्थानिक प्रतिभेला योग्य व्यासपीठ देण्याच्या महानगरपालिकेच्या उपक्रमाला यामुळे मोठे यश मिळाले आहे.




