पथनाट्यातून मतदानाचा संदेश : संत गाडगेबाबा यात्रेत SVEEP उपक्रमांतर्गत प्रभावी जनजागृती

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत.

मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील गर्दीच्या ठिकाणी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून मतदान जनजागृती केली जात आहे.

या उपक्रमाचाच एक भाग म्हणून गाडगे नगर परिसरातील संत गाडगेबाबा यात्रेत पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी मतदान जनजागृती करण्यात आली.

यात्रेकरू, नागरिक व मतदारांना उद्देशून सादर करण्यात आलेल्या पथनाट्यात मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील प्रत्येक मताची ताकद तसेच मतदान न केल्यास होणारे परिणाम अत्यंत साध्या, मनोरंजक आणि परिणामकारक पद्धतीने मांडण्यात आले.

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावणे का आवश्यक आहे, याचे जिवंत प्रात्यक्षिक पथनाट्यातून सादर करण्यात आले. या सादरीकरणाला उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अमरावती महानगरपालिका व स्वीप विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होऊन आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top