मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर श्रीचंद तेजवानी यांचा गौरव

मा.मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विदर्भ सिंधी विकास परिषदतर्फे आयोजित ‘कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.

यावेळी सिंधी समाजाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागणीला न्याय देत मालकी हक्काच्या पट्ट्यांच्या वितरण प्रक्रियेला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अधोरेखित करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, मध्य प्रदेशमधील भोपाळ दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार भगवानदास सबनानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे विदर्भ सिंधी विकास परिषद, नागपूरतर्फे आयोजित ‘कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. हाच समाज आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज आघाडीवर असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे.

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे अभियान देशभर राबवले गेले. सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमण म्हणून गणल्या जात होत्या. त्यामुळे सिंधी बांधवांना मालकी पट्टे मिळावे, अशी मागणी सुरू होती.

संधी मिळताच आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला आणि सिंधी बांधवांना वर्ग एकच्या शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

आगामी काळातही अत्यंत वेगाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी वेगळ्या पद्धतीने नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करतांना सांगीतले की, आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भावनिक आहे. विदर्भ सिंधी विकास परिषद, नागपूरतर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार होणे, ही माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण सिंधी समाजासाठी गौरवाची बाब आहे.

सिंधी समाजाने देशाच्या विकासात नेहमीच सकारात्मक योगदान दिले आहे. फाळणीनंतर अत्यंत कठीण परिस्थितीत भारतात आलेल्या आपल्या समाजाने मेहनत, प्रामाणिकपणा आणि उद्योजकतेच्या बळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आज शासनाने मालकी हक्काच्या पट्ट्यांबाबत घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा सिंधी समाजाच्या अनेक वर्षांच्या संघर्षाला मिळालेला न्याय आहे.

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधी बांधवांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने हाताळत मालकी हक्काचा मार्ग मोकळा केला, यासाठी संपूर्ण समाज त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे. हा निर्णय हजारो कुटुंबांना स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top