पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार यांची भेट

यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार तसेच योगेश पीठे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी यांनी आज पाचही झोनला भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान जनगणना कक्ष व विविध गटांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी थेट संवाद साधून माहिती संकलन प्रक्रियेची सद्यस्थिती, कामातील प्रगती, तसेच येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली. कामाची गती, अचूकता आणि वेळेत पूर्ण होणारे उद्दिष्ट याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

प्रगणकांकडून जमा होणारी माहिती ही पर्यवेक्षकांनी अत्यंत काटेकोरपणे तपासून, शहानिशा करूनच पुढील प्रक्रियेसाठी पाठवावी, असे स्पष्ट निर्देश दिले. माहितीची गुणवत्ता आणि अचूकता राखणे अत्यंत आवश्यक असून कोणतीही त्रुटी राहू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.

तसेच जनगणना कामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून काम अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

क्षेत्रीय स्तरावर काम करताना समन्वय राखणे आणि वेळेचे काटेकोर पालन करणे यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top