आयुक्‍तांनी घेतला मान्‍सुनपुर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्‍ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे

हवामान खात्‍याने राज्‍यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्‍यापेक्षा जास्‍त पाऊस पडण्‍याच्‍या अंदाज वर्तवला आहे.

पावसाच्‍या कालावधीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या दृष्‍टीने मनपाच्‍या सर्व यंत्रणांनी सज्‍ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्‍तीच्‍या काळात सर्व संबंधीत मनपा यंत्रणांनी समन्‍वयाने काम करावे असे मनपा आयुक्‍त वर्षा लड्डा यांनी सांगितले.

अमरावती महानगरपालिकेने नैसर्गिक आपत्‍ती उपाय योजना आराखडा तयार केला असुन अमरावती शहरात नैसर्गिक आपत्‍तीच्‍या वेळी आवश्‍यक ती उपाय योजना तयार करण्‍याच्‍या दृष्‍टीने मुख्‍य आपातकालीन कक्षाचे प्रमुख म्‍हणुन दिनेश हंबर्डे अग्निशमन अधिकारी (मो.क्र.९४२३१२६८२८) व अजय पंधरे अधिक्षक, अग्निशमन विभाग (मो.क्र.७०३०९२२८६९) यांची नियुक्‍ती केली आहे.

प्रभागा अंतर्गत आपतकालीन कक्षाचे प्रमुख सहाय्यक आयुक्‍त हे राहतील.

या बैठकीत अनेक महत्‍वपुर्ण विषयांवर चर्चा करण्‍यात आली जसे की आपत्‍ती व्‍यवस्‍थापना कक्षाची झोन निहाय स्‍थापना करणे, महानगरपालिकेच्‍या विविध विभागांकरिता SOP (Standard Operating Procedure) तयार करणे, शोध व बचाव पथकाची स्‍थापना करणे, शहरातील नाल्‍यांच्‍या गाळ काढणे, विद्युत/प्रकाश व्‍यवस्‍था अद्यावत ठेवणे, शहरातील संभाव्‍य पुरग्रस्‍त भागाचा शोध घेऊन नोंद ठेवणे, औषधी साठा पुरवठा व वितरण व्‍यवस्‍था करणे, ब्लिचींग पावडर व इतर रोग नियंत्रक इत्‍यादीची फवारणी करणे, आपातकालीन स्थितीत निवा-याची व्‍यवस्‍था करणे, शहरातील शिकस्‍त इमारतीची नोंद घेणे व घरमालकांना नोटीस बजावणे, प्रभाग आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीची नागरी सहभागाद्वारे स्‍थापना करणे, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन विषयक सामुग्रीची पुर्व व्‍यवस्‍था/अद्यावत ठेवणे, मोबाईल व लघुसंदेश यंत्रणा अद्यावत करणे, आपतकालीन स्थितीत शहर बसेस राखीव ठेवणे, महानगरपालिकेच्‍या अधिकारी / कर्मचारी यांचे आपातकालीन स्थितीकरिता नेमणूक करणे, पोलीस व महसुल यंत्रणेशी समन्‍वय साधुन आपातकालीन परिस्थितीचा सामना करणे, शहरामध्‍ये जनजागृती मोहीम राबविणे, नाल्‍यातील गाळ व कचरा साफ करणे, महानगरपालिकेचे दुरध्‍वनी क्रमांकाची यादी तयार करणे, दर आठवड्याला संबंधीत अधिकारी / कर्मचा-यांचे सभा घेऊन माहिती अद्यावत करणे, हॉटेल्‍स व अन्‍न विक्री स्‍थळांची तपासणी मोहीम राबविणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top