अनधिकृत भंगार दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई; चार ट्रक भंगार साहित्य जप्त

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान घुमंतुकांकडून भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले.

अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अन्सार अहमद व संदीप सोनोने यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान सुमारे चार ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले असून ते कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या पथकाने श्याम चौक येथील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील भागात, जुने तहसील कार्यालय परिसरात तसेच जवाहर गेट रोडवरील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top