अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. १५ जून २०२६ रोजी गाडगेनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण १८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये काही ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर तसेच ५१ मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आला.
मात्र दोन आस्थापनांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करत दंड आकारला.
यामध्ये कन्हैया दूध डेअरी यांच्याकडून ₹५,००० तर गाडगेबाबा दूध डेअरी यांच्याकडून ₹५,००० असा एकूण ₹१०,००० दंड वसूल करण्यात आला.
नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
