अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर झोन क्र.२ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी राजापेठ व भुतेश्वर चौक ते रविनगर परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण २२ व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी काही ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा तसेच ५१ मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिकचा वापर आढळून आला. मात्र, दोन आस्थापनांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये प्रथमेश बुक डेपो अँड जनरल यांच्याकडून ₹५,००० आणि श्री स्वीट्स अँड जनरल यांच्याकडून ₹५,००० असा एकूण ₹१०,००० दंड वसूल करण्यात आला.
तसेच डस्टबिन नियमांचे पालन न केल्याप्रकरणी हरियाणा स्पेशल जलेबी यांना ₹१,०००, अर्णव बुक डेपो यांना ₹१,००० आणि अकरम खान अकबर खान यांना ₹५०० दंड आकारण्यात आला.
या विशेष मोहिमेत एकूण ₹१२,५०० इतका दंड वसूल करण्यात आला.
नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ्य निरीक्षक धनीराम कलोसे, मिथुन उसरे, सचिन सैनी, मिथुन वाघमारे, पवन चावरे, अजिंक्य जवंजाळ, शक्ती पिवाल आणि योगेश कंडारे यांनी सहभाग घेतला.
