अमरावती महानगरपालिकेत माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम महानगरपालिका मुख्यालयातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला.
कार्यक्रमात महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते स्व. अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, झोन सभापती इस्माईल कासम लालुवाले, नगरसेवक आशिष अतकरे, सचिन वैद्य, मनीष बजाज, प्रमोद महल्ले, गुड्डू धर्माळे, अॅड. प्रशांत देशपांडे, माजी नगरसेवक भूषण बनसोड, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजित अनंतराव पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
