अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त चपरासीपुरा कॅम्प येथील महानगरपालिका उर्दू माध्यमिक शाळा क्रमांक ६ मध्ये वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रीतीताई रेवणे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती जयश्रीताई वानखडे नगरसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमास महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, वहिद खान, जकीयोद्दीन काझी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाफीज सना उल्लाह, मुक्ती शाकीर तसेच महानगरपालिका शिक्षण विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी सपकाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाट मोकळी करून देत आकर्षक चित्रे साकारली. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहायक शिक्षक अजहर खान यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका नाहीद तबस्सुम यांनी कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बदीउद्दीन, रफीक अहमद सर , नाजेमा बी मैडम , फौजिया मैडम , दुरदाना मैडम , दरकश मैडम यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
