मनपात माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी जयंती साजरी

गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट,२०२६ रोजी माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी जयंती निमित्‍य हारार्पण व सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाले.

माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले.

तसेच माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण कार्यक्रम झाल्‍यानंतर सदभावना दिवस प्रतिज्ञेचे सामुहीक वाचन करण्‍यात आले.

सदर कार्यक्रमास अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गटनेते नाना आमले, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, गटनेते शेख हमीद शेख वाहेद, झोन सभापती माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, इस्माईल कासम लालुवाले, विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, शिक्षण समिती उपसभापती वंदना मडघे, सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पीठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शेख हातिम शेख इब्राहिम यांनी देशातील पाच प्रमुख परीक्षांमध्ये एकाच वेळी यश संपादन केल्याबद्दल महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्तेही शेख हातिम यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top