अमरावती महानगरपालिकेच्या वतीने रामपुरी कॅम्प परिसरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले झोन क्र.१ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी केली.
यावेळी प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, परिसरातील स्वच्छता तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन डस्टबिनची उपलब्धता याबाबत पाहणी करण्यात आली.
मोहिमेदरम्यान एन. बी. श्रृंगारे यांच्याकडे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ₹५,००० इतका दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत एकूण ₹५,००० दंडाची वसुली झाली.
