कठोरा रोड या परिसरात महापालिकेची अवैध बांधकामा अतिक्रमणावर धडक मोहीम; मा.आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदवले, यांच्या निर्देशानुसार कारवाई

अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी मंगळवार, दिनांक, 25 ऑगस्ट 2026 रोजी व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

आयुक्‍त, डॉ.मंगेश गोंदवले, यांच्या स्पष्ट निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने व झोन क्र.1 यांच्याद्वारे संयुक्तपणे कठोरा रोडवरील साई शिखर अपार्टमेंटमधील 10 दुकानदाराद्वारे दुकानासमोरील पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे लोखंडीशेडउभारून व दुकानाचे साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते, सदर अतिक्रमण स्वतः काढून घेणे बाबत त्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती परंतु त्यांच्याद्वारे सदर अतिक्रमण न काढल्यामुळे कठोरा रोड परिसरात दुपारपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यवाही सुरू केली.

मोठ्या प्रमाणात कारवाई : दुकाने, शेड्स, रस्त्यावरील अडथळे हटवले अतिक्रमण विभागाने जेसीबी, 03 ट्रक आणि मनुष्यबळाच्या मदतीने अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

रस्त्याच्या कडेला अनधिकृत पार्किंग, वापरलेली जागा तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वस्तूंचीदेखील तत्काळ उचल-उपट करण्यात आली.

महापालिकेकडून व्यापाऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही काही ठिकाणी विरोधाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र प्रशासनाने संयमपूर्वक आणि कायद्याचे पालन करत कारवाई पूर्ण केली.

आयुक्तांचा स्पष्ट संदेश : “शहर स्वच्छ, सुटसुटीत आणि वाहतुकीस सोपे करण्यासाठी मोहीम कायम”

आयुक्त डॉ.मंगेश गोंदवले, यांनी सांगितले की, अतिक्रमणमुक्त शहर हा नागरिकांच्या सोयी-सुविधांचा महत्त्वाचा भाग आहे. रस्ते व सार्वजनिक जागा ही सर्वांच्या वापरासाठी असतात.

अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढते, अपघातांचा धोका निर्माण होतो आणि शहराची सौंदर्यही नष्ट होते. त्यामुळे ही मोहीम सातत्याने राबविली जाणार आहे. महानगरपालिकेने पुढील काही दिवसांत शहरातील इतर प्रमुख चौक व बाजारपेठेतही अशाच धडक कारवाया राबविण्याचे संकेत दिले आहेत.

यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून दररोज विविध ठिकाणी तपासणी व कारवाई करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने नागरिक, व्यापार्‍यांनी स्वयंप्रेरणेने अतिक्रमण हटवावे, सार्वजनिक जागांचा दुरुपयोग करू नये आणि शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

अमरावती शहरात वाढती लोकसंख्या आणि विस्तारणारे व्यावसायिक व्यवहार लक्षात घेता, अतिक्रमणमुक्त शहर ही प्रशासनाची प्राथमिकता बनली आहे.

कठोरा रोड या परिसरातील ही कारवाई त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सदर कार्यवाही, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख, योगेश कोल्हे, झोन क्र.1 चेअभियंता, अंकुर डवरे,संदीप सोनवणे,यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे, सदर कार्यवाही मध्ये पोलीस कर्मचारी, व अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top