साईनगर परिसरात महानगरपालिकेची विशेष मोहीम; प्रतिबंधित प्लास्टिक वापरासह डस्टबिनच्या उपलब्धतेची तपासणी

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी साईनगर परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच झोन क्र. ४ चे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, परिसरातील स्वच्छता आणि दुकानदारांकडे ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र डस्टबिन उपलब्ध आहेत की नाही, याची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान करवा डिस्पोजेबल येथे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने ५ हजार रुपयांचा दंड आकारण्‍यात आला. तसेच जय माता दि प्रोव्हीजन येथे दोन डस्टबिन उपलब्ध नसल्याचे आढळल्याने १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईतून एकूण ६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने, स्वास्थ्य निरीक्षक सोपान माहुलकर, प्रियंका बैस, प्रवीण उसरे, वैभव खरड, सुमेध मेश्राम, सचिन सैनी सहभागी झाले होते.

महानगरपालिकेकडून प्लास्टिक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही नियमितपणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top