शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर,२०२६ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला.
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्य उपमहापौर सचिन भेंडे यांचे हस्ते पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले.
यावेळी अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, मुख्यलेखापरीक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, सतिश ताथोड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
