मनपा आदर्श शाळा, आदर्श शिक्षक पुररकार वितरण सोहळा संपन्न
अमरावती – अमरावती महानगरपालिका शिक्षण विभाग द्वारा श्रीमती सौम्या शर्मा आयुक्त मनपा यांच्या मार्ग दर्शनात दि. 9 सप्टेंबर रोजी क्षितिज मंगल कार्यालय येथे शिक्षण दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अमरावती महानगरपालिका सन 2025 26 मधील आदर्श शाळा पुरस्कार, मराठी माध्यम मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा जेवड, उर्दू माध्यम मनपा उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 9 नूर नगर,आदर्श शाळा प्रोत्साहन पर बक्षीस मनपा मराठी शाळा क्रमांक 15 एस आर पी एफ कॅम्प, मनपा उच्च प्राथमिक उर्दू शाळा कॅम्प टीव्ही हॉस्पिटल जवळ यांना देण्यात आला.आदर्श शिक्षक पुरस्कार मध्ये सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार मनपा मराठी शाळा क्रमांक 14 च्या सहाय्यक शिक्षिका कु. चेतना बोंडे, आदर्श शिक्षक पुरस्कार कु. सीमा सहेर शेख अफजल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार अझर उल्ला खान मनपा मराठी कन्या शाळा क्रमांक 3 बडनेरा, तसेच मेजर ध्यानचंद क्रीडा शिक्षक पुरस्कार उर्दू शाळा क्रमांक 8 श्री अनवर मुरसलीन, प्रोत्साहन पर उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक कु नाझीमा तहसीम उर्दू आय एम एस शाळा यांना देण्यात आला.तसेच इयत्ता दहावी व बारावी मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी पास आहे अशा नउ शाळांचा सत्कार, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा एन एम एम एस परीक्षा यामध्ये 75 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी पास आहेत अशा शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सत्कार, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले वक्तृत्व सादर केले अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती शिल्पा नाईक अतिरिक्त आयुक्त,म. न. पा प्रमुख अतिथी श्रीमती मेघना वासणकर उपायुक्त मनपा,श्याम सुंदर देव मुख्य लेखा परीक्षक,दत्तात्रय फिस्के मुख्य लेखा धिकारी, अमित डेंगरे सिस्टम मॅनेजर, नंदकिशोर तिखीले सहा.आयुक्त, सचिन बोन्द्रे पशु वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाँचे सूत्र संचालन श्रीमती प्रियांका हंबर्डे, श्रीमती प्रणाली ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन पंकजकुमार सपकाळ सकाअ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेकरीता श्रीमती लिना आकोलकर अधिक्षक,वहीद खान, योगेश पखाले, श्रीमती ज्योती बन्सोड, जावेद खान शाळा निरीक्षक, प्रविण ठाकरे क्रिडा निरीक्षक,योगेश राणे, संजय बेलसरे, निमामुददीन काझी, सुषमा दुधे, शुभांगी सुने विषय तज्ञ, धिरज सावरकर, दिपाली थोरात, अतुल बोबडे, कैलास कुलट, उज्वल जाधव, सोनिया पवार, भारती मालखेडे, पुनम कणेर, वैशाली सोळंके, विशाल वालचाळे, गिरीष लाकडे यांनी परीश्रम घेतले,
अमरावती महानगरपालिका शिक्षकांचा झाला सन्मान














