अमरावती प्रतिनिधी,
दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात NULM–SBM समन्वय अंतर्गत प्रशिक्षण व सभा हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) व स्वच्छ भारत मिशन (SBM) समन्वयाने करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश NULM स्टाफ, लघुउद्योग उभारणीस इच्छुक NULM बचत गट, SBM अंतर्गत कार्य करण्यास इच्छुक स्वच्छता सखी तसेच IEC YM टीम व SKP CB FFCT टीम यांना मार्गदर्शन करणे हा होता.
महिला बचत गटांना नवीन लघुउद्योग सुरू करण्याच्या संधी, प्रक्रिया तसेच शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छता सखींसाठी उपलब्ध रोजगारसंधी व SBM अंतर्गत कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात NULM स्टाफ सदस्य, बचत गट, स्वच्छता सखी, IEC YM टीम व SKP CB FFCT टीम यांचा सक्रिय सहभाग होता.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हा कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार पार पडला असून सर्व संबंधितांनी वेळेत उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षण व सभेमुळे NULM–SBM समन्वय अधिक दृढ होईल, बचत गट व स्वच्छता सखींसाठी नवीन रोजगारसंधी निर्माण होतील तसेच IEC YM टीम व SKP CB FFCT टीमच्या कार्ययोजनांना गती मिळेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी मार्गदर्शन करताना पुढील निर्देश दिले की, महिला बचत गटांनी उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी. स्वच्छता सखींसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधींचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा करावी. NULM व SBM स्टाफने नियमित समन्वय साधून प्रत्येक गटापर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी. IEC YM व SKP CB FFCT टीमने प्रशिक्षणाद्वारे जनजागृती मोहिमांना गती द्यावी आणि प्रत्यक्ष कार्यवाहीवर भर द्यावा. सर्व संबंधितांनी वेळेत कार्य पूर्ण करून अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छ, सशक्त व आत्मनिर्भर शहराच्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लावावा.
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी उपस्थितांना आवाहन केले की, महिला बचत गटांनी लघुउद्योग उभारणीच्या संधींचा फायदा घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे व इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरावे. स्वच्छता सखी बहिणींनी स्वच्छ भारत मिशनांतर्गत उपलब्ध रोजगारसंधींचा लाभ घेऊन समाजाच्या स्वच्छता व आरोग्य जपणाऱ्या कार्यात पुढाकार घ्यावा. NULM व SBM स्टाफने प्रत्येक घटकाला योग्य मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम अधिक प्रभावीपणे करावे. IEC YM व SKP CB FFCT टीमने समाजजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमांतून जनसामान्यांना सहभागी करून स्वच्छ, सक्षम व आत्मनिर्भर अमरावती घडविण्यात सक्रिय भूमिका बजवावी. त्यांनी पुढे आवाहन केले की, सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच स्वच्छ, सशक्त आणि आत्मनिर्भर अमरावती घडविणे शक्य होईल.
अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना


