अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी – अतिक्रमण हटविण्याचे आणि जागा विकसित करण्याचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १२ सप्‍टेंबर,२०२५ रोजी ट्रान्‍सस्‍पोर्ट नगर, ट्रान्‍सस्‍पोर्ट मार्केट, अबुबकार नगर, सोपीयान नगर परिसरातील नाली, अतिक्रमण, भंगार साहित्‍य तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तारखेडा येथे सुरु असलेल्या बांधकामांची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान आयुक्‍तांनी संबंधित विभागांना तत्काळ अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सदर जागा विकसित करण्याबाबतही त्यांनी आदेश दिले. बाजार परवाना विभाग व अतिक्रमण विभागाला अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले.

महानगरपालिकेच्या या कार्यवाहीमुळे संबंधित परिसरात स्वच्छता, शिस्तबद्ध विकास आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होणार आहे. या पाहणी दरम्‍यान आयुक्‍तांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. सदर नागरिकांच्‍या समस्‍या निराकरण करण्‍याचे संबंधीत अधिका-यांना निर्देशित करण्‍यात आले.
महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, ट्रान्सपोर्ट नगर, ट्रान्सपोर्ट मार्केट, अबुबकार नगर व सोपीयान नगर परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवून जागा स्वच्छ व सुशोभित करावी. भंगार साहित्य पूर्णपणे काढून टाकावे तसेच सदर जागा विकसित करण्याची कार्यवाही तातडीने हाती घ्यावी. बाजार परवाना विभाग व अतिक्रमण विभागाने कठोर कारवाई करून नागरिकांना स्वच्छ व सुसंस्कृत परिसर उपलब्ध करून द्यावा.

महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आवाहन केले की, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये. स्वच्छता आणि शिस्तबद्ध विकासासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. आपला परिसर सुंदर, हिरवागार आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा.

यावेळी तारखेडा येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांचीही त्यांनी पाहणी केली. कामांना गती देऊन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत, या योजनेंतर्गत नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा असेही त्यांनी सांगितले.
या पाहणी दरम्‍यान शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्‍त दिपक खडेकार, उदय चव्‍हाण, उपअभियंता विवेक देशमुख, अभियंता आनंद जोशी, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक राजु डिक्‍याव, राजेश राठोड, स्‍वास्‍थ निरीक्षक, मनपा कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top