अग्निशमन सेवा अधिक सक्षम व सांस्कृतिक भवन परिसर कार्यक्षम करण्याचे आयुक्‍तांचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी २३ सप्टेंबर रोजी अग्निशमन मुख्य कार्यालय वालकट कंपाऊंड, जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील भाग, खापर्डे बगीचा परिसर तसेच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसराची पाहणी केली.

पाहणीदरम्यान त्यांनी अग्निशमन मुख्य कार्यालयाचे नियोजन तपासून आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात आणि अतिक्रमण निर्मूलनासाठी काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील चालू कामकाज नागरिकांच्या सोयीसाठी अधिक शिस्तबद्ध व कार्यक्षमतेने पार पाडण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वयातून कामकाज केल्यास नागरिकांना उत्तम सुविधा मिळतील, असेही त्यांनी व्यक्त केले.

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की, शहराच्या स्वच्छतेसाठी, अतिक्रमण निर्मूलनासाठी आणि शिस्तबद्ध नियोजनासाठी प्रत्येकाने सक्रीय सहभाग द्यावा.

अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी व सांस्कृतिक भवन परिसराचा उत्तम उपयोग नागरिकांना व्हावा यासाठी सर्वांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. आपल्या सहकार्यामुळे अमरावती शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुबक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणीदरम्यान माजी गटनेता दिनेश बुब, शहर अभियंता रविंद्र पवार, मुख्य अग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे, सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक आयुक्त दीपक खडेकार, अग्निशमन अधीक्षक संतोष केंद्रे, उपअभियंते प्रमोद इंगोले, दिनेश हंबर्डे तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top