अमरावती महानगरपालिकेत गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त हारर्पण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा आत्राम, डॉ. स्वाती कोवे, डॉ. संदीप पाटबागे, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम व्यवस्थापक वर्षा गुहे, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे विचार व आदर्श आजही समाजजीवनाला दिशा देणारे असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.


