September 25, 2025

अमरावतीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम

हमालपुरा ते मालटेकडी मार्गावर स्वच्छतेसह अतिक्रमण निर्मूलन — नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अमरावती महानगरपालिकेतर्फे “स्वच्छता ही सेवा २०२५” उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर रोजी हमालपुरा ते मालटेकडी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, आरोग्य पथक आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामाला गती मिळाली. मोहिमेदरम्यान कचरा साफसफाईसोबतच अनधिकृत अतिक्रमणाचे […]

अमरावतीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम Read More »

गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार २५ सप्टेंबर २०२५ रोजी गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरात व्यापक अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. सकाळपासूनच सुरू झालेल्या या कारवाईत क्रॉसिंगलगतच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अवैध बांधकामे, फड व विविध साहित्य जप्त करण्यात

गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई Read More »

मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची कडक भूमिका; थकबाकीदारांवर कारवाईची तयारी

अमरावती महानगरपालिकेत आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली मालमत्ता कर वसुली संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. आयुक्तांनी वसुली पथकांना ठाम शब्दांत इशारा दिला — “कर वसुल करा, अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार राहा.” महानगरपालिका क्षेत्रात सुमारे २५०० मालमत्ता धारकांकडे एक लाख रुपयांहून अधिक थकबाकी प्रलंबित आहे. या थकबाकीदारांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून,

मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाची कडक भूमिका; थकबाकीदारांवर कारवाईची तयारी Read More »

अमरावती महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

अमरावती महानगरपालिकेत गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त हारर्पण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त

अमरावती महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम Read More »

नागरिकांच्या तक्रारीवर आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची थेट पाहणी

नागरिकांच्या तक्रारींना तत्परतेने प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी २४ सप्टेंबर २०२५ रोजी वारकरी नगर, ज्योती कॉलनी, कुंभारवाडा आणि स्वागतम कॉलनी परिसराचा दौरा करून स्वच्छता, कच्चे रस्ते व नाल्यांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्‍तांनी परिसरातील साफसफाईची स्थिती, नाल्यांची स्वच्छता व वाहतुकीतील अडचणींचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक रहिवाशांनी सांडपाणी व्यवस्थापन, कच्च्या

नागरिकांच्या तक्रारीवर आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची थेट पाहणी Read More »

अमरावती महापालिकेतर्फे भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा — विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळावी, आत्मविश्वास वाढावा आणि करिअरमध्ये यश संपादन करता यावे या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेतर्फे २४ सप्टेंबर २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत झालेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक सौ. सौम्या शर्मा (चांडक) (2018 UPSC

अमरावती महापालिकेतर्फे भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा — विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

Scroll to Top