“विद्यार्थी संसदेत स्वच्छतेचा संदेश – अमरावतीच्या तरुणांकडून नागरिकत्वाची प्रेरणा”

अमरावती महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली ३० सप्टेंबर २०२५ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात “विद्यार्थी संसद” आयोजित करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन या विषयावर आधारित या उपक्रमात शहरातील जवळपास ७० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छतेविषयी आपली ठोस मते, विधायक सूचना आणि नवीन कल्पना मांडल्या.

विद्यार्थ्यांच्या प्रभावी चर्चेद्वारे नागरिकांना शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी समाजाने एकत्रितपणे योगदान द्यावे, असा ठाम संदेश दिला गेला. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेबाबत जागरूकता वाढते, पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ होते आणि जबाबदार नागरिकत्वाचे भान अधिक बळकट होते.

स्पर्धेत प्रथम क्रमांक: प्रभव रविंद्र कळगे, द्वितीय क्रमांक: तमन्ना नाज अब्दुल रशीद, तृतीय क्रमांक: शेख इमरान शेख रशीद यांनी मिळवला.

प्रो. डॉ. नितीन चव्हाळे, प्रो./ ॲडव्होकेट योगेश सोळंके, लोकसभा स्पीकर इंजिनियर मिलिंद कहाले आणि स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके यांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वी झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top