“राजापेठ झोनमध्ये प्लास्टिक जप्ती मोहिमेत ११ हजार रुपये दंड; नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन”
अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने राजापेठ झोन क्र. ०२, प्रभाग क्र. ०७ मधील जवाहर स्टेडियम परिसरात विशेष प्लास्टिक जप्ती मोहिमेचे आयोजन केले. या कारवाईदरम्यान २३५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजल ग्लास आणि चमचे जप्त करण्यात आले. प्लास्टिकचा साठा केल्याबद्दल आस्थापनाधारकावर १०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच परिसरातील दोन आस्थापनांकडे डस्टबिन नसल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात […]

