अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने राजापेठ झोन क्र. ०२, प्रभाग क्र. ०७ मधील जवाहर स्टेडियम परिसरात विशेष प्लास्टिक जप्ती मोहिमेचे आयोजन केले. या कारवाईदरम्यान २३५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजल ग्लास आणि चमचे जप्त करण्यात आले. प्लास्टिकचा साठा केल्याबद्दल आस्थापनाधारकावर १०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला.
तसेच परिसरातील दोन आस्थापनांकडे डस्टबिन नसल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला, एकूण ११,००० रुपये दंड वसूल करण्यात आले. महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि स्वच्छता अधिकारी डॉ.अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
नागरिकांना प्लास्टिक वापर पूर्णपणे टाळण्याचे, ओला व सुका कचरा वेगळा ठेवून दोन स्वतंत्र डस्टबिनचा वापर करण्याचे तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
या मोहिमेत अतिक्रमण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि झोन क्र. २ चे स्वच्छता अधिकारी उपस्थित होते, ज्यांच्या सहकार्यामुळे मोहिमेला यश मिळाले.





