दि. ७ ऑक्टोबर रोजी अमरावती महानगरपालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले होते.
या वेळी उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
