“प्लॅस्टिकमुक्त अमरावती” अभियानाला गती देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने कडवी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली.
या कारवाईदरम्यान मनपाच्या संयुक्त पथकाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा चार ट्रक इतका साठा जप्त करून पाच गोदामे सील केली. सुमारे ७ हजार किलो, अंदाजे ₹६५ हजार किंमतीचा प्लॅस्टिक साठा जप्त करण्यात आला.
ही मोहीम आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण व स्वच्छता विभागाच्या संयुक्त पथकाने हाती घेतली.
तपासणीदरम्यान प्लॅस्टिक पिशव्या, कप, प्लेट्स, ग्लासेस आदी साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आढळले. सर्व साहित्य जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.










