अमरावती शहरात हवामान लवचिकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी कूल रूफ तसेच ग्रीन बिल्डिंग पद्धतींचा प्रभावी अवलंब करणाऱ्या बिल्डरांचा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री गिरीश नागपुरे, श्री शैलेश वानखडे
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री शैलेंद्र देशमुख, माया तायडे
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री विजय परांजपे, गोविंद तट्टे
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री अक्षय शर्मा, श्री अजय डांबले
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री अद्वैत सावरकर, श्री लक्ष्मीकांत जोशी( जोशी बिल्डर्स)
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री रोहित पुंशी, श्री सागर बुटे
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री गिरीश नागपुरे, अभिनंदन को-ऑपरेटिव बँक तर्फे श्री शिवाजी देठे
इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री आकाश मोहता यांचा गौरव झाला.
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्य हवामान कृती आराखड्या (SAPCC), माझी वसुंधरा अभियान तसेच शहराच्या डीकार्बोनायझेशन रोडमॅपमध्ये या उपक्रमांतून महत्त्वपूर्ण प्रगती होत असून त्याचा थेट लाभ राज्य आणि राष्ट्रीय हवामान उद्दिष्टांना होत आहे.
कूल रूफ, ऊर्जा कार्यक्षम इमारती आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींमुळे शहरात उष्णतेचा ताण कमी होण्यास मदत होते, ऊर्जा कार्यक्षमता वाढते आणि नागरिकांच्या आरोग्य व कल्याणात सुधारणा दिसून येते. शाश्वत भविष्यासाठी दिशा दाखवत या बिल्डरांनी केलेल्या कामाचे आयुक्तांनी कौतुक केले.
अमरावती महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे शहर स्मार्ट, हरित आणि हवामान-लवचिक बनण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




