अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर गारद घालत आज उत्तर झोन क्र.१ मधील मालमत्ता कर वसुल रु.९.७७, मध्य झोन क्र.२ मधील मालमत्ता कर वसुल रू.१.७३, पुर्व झोन क्र.३ मधील मालमत्ता कर वसुल रू.३.४६, दक्षिण झोन क्र.४ मधील मालमत्ता कर वसुल रु.४.३३, पश्चिम झोन क्र.५ मधील मालमत्ता कर वसुल रु.२.७३ असे एकूण २२.०३ लाख रुपयांची प्रभावी वसुली केल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये विशेष मोहीम राबवत पथकांनी थकबाकीदारांना नोटिसा देऊन तत्काळ देयक भरण्याची कारवाई केली.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी वेळेवर मालमत्ता कर भरणे आवश्यक असल्याचे आवाहनही मनपा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.





