शनिवार दिनांक ६ डिसेंबर,२०२५ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अमरावती महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्य महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांचे शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांचे हस्ते हारार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त श्रीकांतसिंह चौव्हान, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, मनोज शहाळे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, अभिलेखागार नंदकिशोर पवार, मुकेश खारकर, विनोद मार्वे, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

