अमरावती महानगरपालिकेच्या SBM RRR सेंटर, अंबिका नगर मनपा शाळा येथे 10 डिसेंबर 2025 रोजी संकल्प सेवा संस्थेद्वारे आयोजित “साझा अलमारी – आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक” या उपक्रमांतर्गत संकलित साहित्यमधील वस्तूंचे अधिकृत सुपूर्दकरण करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश Reduce–Reuse–Recycle संस्कृती बळकट करणे, वापरण्यायोग्य साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढवणे असा आहे. स्वच्छ, उपयुक्त साहित्य इतरांपर्यंत पोहोचवून “आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक” हा मानवी संवेदनशीलतेचा संदेश प्रभावीपणे दिला जात आहे.
SBM RRR सेंटर हे शहरातील पुनर्वापरयोग्य साहित्याचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वसन करणारे महत्त्वाचे केंद्र असून नागरिकांकडून आलेले चांगल्या स्थितीतील साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवले जाते.
यामुळे कचरा निर्मिती कमी होऊन पर्यावरणीय शाश्वततेला बळकटी मिळते. “साझा अलमारी” सारखे उपक्रम शहरातील स्वच्छता, संवेदन आणि शाश्वत भविष्याची पायाभरणी करतात.
या कार्यक्रमास महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
त्यांनी संकलित साहित्याचे निरीक्षण करून उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी नागरिकांना वापरण्यायोग्य साहित्य थेट RRR सेंटरमध्ये जमा करण्याचे आवाहन केले व सांगितले की अशा उपक्रमांमुळे शहरात “Reduce–Reuse–Recycle” संस्कृती अधिक प्रभावी होते.
उपक्रमांतर्गत संकलित वस्तूंमध्ये पुरुष, महिला, मुले यांचे कपडे, शालेय साहित्य, चप्पल-बूट, खेळणी, घरगुती साहित्य आदींचा समावेश असून ते अधिकृतरीत्या RRR सेंटरकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
हे साहित्य बिनेरा झोनमधील “स्लम हाट” कार्यक्रमामार्फत गरजू नागरिकांना वितरित केले जाणार आहे. उपक्रमाचे संपूर्ण नियोजन महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान टीमने प्रभावीपणे केले.





