महानगरपालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; तयारीचा सखोल आढावा | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नियंत्रण अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये आचारसंहिता कक्षाचे व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्त तसेच FST, SST, VST आणि VVT पथकांचे नियोजन व प्रभावी नियंत्रण यांचा समावेश होता.

CVIGIL व ESMS प्रणालीतील कामकाज आणि तक्रार निवारण यंत्रणेवरही विशेष भर देण्यात आला.

मतदान व मतमोजणीसाठी मनुष्यबळ व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, मतदार केंद्र व मतमोजणी केंद्र व्यवस्थापन, Strong Room व्यवस्था, वाहतूक नियोजन, एक खिडकी सेवा, Sveep Plan तसेच साहित्य पुरवठा व आवश्यक फॉर्मच्या छपाई-वितरणाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

त्याचप्रमाणे EVM व्यवस्थापन, फर्निचर व इतर साहित्याचे वाटप, खर्चाचा हिशोब व लेखा परीक्षण, MCMC जाहिरात प्रमाणन, माहिती कक्ष व्यवस्थापन, अहवाल सादरीकरण, संगणकीकरण, माहिती संकलन तसेच Observer नोट्स व सादरीकरणांची तयारी यावर चर्चा करण्यात आली.

मतदान व मतमोजणी केंद्रांची स्वच्छता, भोजन व आवश्यक सुविधा, झोन कार्यालयांचे कार्यनियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन यांचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीत आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी सर्व यंत्रणांनी वेळेत आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध अंमलबजावणी, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top