अमरावती महानगरपालिकेकडून स्वीप अंतर्गत एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृतीचा अभिनव उपक्रम

मा. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने मतदार जनजागृतीसाठी विशेष एलईडी व्हॅनचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

एलईडी व्हॅनच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभाग, वस्ती व सार्वजनिक ठिकाणी फिरून मतदानाचे महत्त्व, मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदानाची पद्धत, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची माहिती तसेच नैतिक व निर्भय मतदानाबाबत प्रभावी दृकश्राव्य स्वरूपात जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सांगितले की, “लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. नवमतदार, युवक, महिला व दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रेरित करणे हा स्वीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.”

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच ‘लोकशाहीचा उत्सव – मतदानाचा हक्क’ हा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमामुळे नागरिकांशी थेट संवाद साधला जाऊन शहरात लोकशाही मूल्यांची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top