महिला शिक्षणाच्या प्रणेत्या व थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अमरावती महानगरपालिकेत शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.
या निमित्त महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षण व सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा उल्लेख केला. सामाजिक विषमता व अन्यायाविरुद्ध लढा देत महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, आत्मनिर्भरता व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांचे विचार कृतीत उतरवण्याचे आवाहन त्यांनी केले.
